मुलानेच कोयत्याने मानेवर वार करून केला जन्मदातीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

दाभोळ -  गणपतीपुळे पश्‍चिमवाडी (ता. दापोली) येथे एका मुलाने आपल्या जन्मदात्या मातेचाच आज दुपारी साडे बाराच्या सुमारास कोयतीने मानेवर घाव घालून खून केल्याची घटना घडली. अरुण गंगाराम इंदुलकर (वय 43), असे त्या निर्दयी मुलाचे नाव आहे. 

दाभोळ -  गणपतीपुळे पश्‍चिमवाडी (ता. दापोली) येथे एका मुलाने आपल्या जन्मदात्या मातेचाच आज दुपारी साडे बाराच्या सुमारास कोयतीने मानेवर घाव घालून खून केल्याची घटना घडली. अरुण गंगाराम इंदुलकर (वय 43), असे त्या निर्दयी मुलाचे नाव आहे. 

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे पश्‍चिमवाडी येथे अरुण गंगाराम इंदुलकर (वय 43) हा आई शेवंताबाई (वय 70) हिच्यासह राहतो. त्याचे वडील सैन्यात असलेल्या दुसऱ्या भावाकडे राजस्थान येथे राहतात. आज दुपारी अरुणने आपल्या आईचा गळा कापून खून केला. त्यानंतर तो घराच्या ओटीवर बसून राहिला, त्यानंतर त्याने शेजारच्या घरात जाऊन आई मेली, असे सांगितले. थोड्या वेळाने शेजारी आले व विचारू लागले तेव्हा अरुण म्हणाला, "मला आईचा राग आला, तिला ठार मारले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता शेवंताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच्या दिसून आल्या. तिची मान कापलेली होती. तत्काळ याची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मोहन पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांताराम रहाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अरुणला खुणासाठी वापरलेल्या कोयतीसह ताब्यात घेतले. उपनिरीक्षक मोहन पाटील पुढील तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder incidence in Dapoli Ratnagiri District