अशी साजरी केली संगमेश्वर तालुक्यात नागपंचमी ; वयोवृध्द महिलांचा अधिक सहभाग...

प्रमोद हर्डीकर
Saturday, 25 July 2020

आंबव गावात तसेच देवरुख मधली आळी परीसरात महिलांनी वारुळाला जावून पुजन करणे पसंद केले.

साडवली (रत्नागिरी) :  श्रावण सणांवर कोरोनाचे सावट असले तरी संगमेश्वर तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांनी नागपंचमी पारंपरिक पद्घतीने साजरी केली.सोशल डिस्टस्टिंगचे पालन करुन वारुळाला जावून दुध,लाह्या,पुष्पपञी वाहुन  नागोबाची आराधना केली.

शहरी भागात घरोघरी नागोबाची मातीची मुर्ती आणुन सुवासिनींनी नागदेवतेची,जिवतीची पुजा करुन गोड धोड नैवेद्य दाखवुन पुजा केरतात  व नागदेवतेचे आर्शीर्वाद घेतात .ग्रामीण भागात महीलांनी घराबाहेर पडुन वारुळाला जावून वारुळाची पुजा करुन नागपंचमी साजरी केली.यामध्ये वयोवृद्घ महिलाही सहभागी झाल्या होत्या हे विशेष.आंबव गावात तसेच देवरुख मधली आळी परीसरात महिलांनी वारुळाला जावून पुजन करणे पसंद केले.

हेही वाचा- कोकणात  आधि कोरोना नंतर सारी आणि आता लेप्टोचा शिरकाव ;  ओटवणेत आढळला लेप्टोचा रुग्ण... -

पुजेचे साहित्य घेवुन वारुळाला जाणार्‍या महीलांची संख्या मोठी होती.कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेवुनच महिलांनी नागपंचमी पारंपरिक पद्घतीने साजरी केली.देवरुखमध्ये एक दोन घरी सर्प आढळुन आले.राजु काकडे हेल्प अॅकॅडमी सर्पमिञांनी ते पकडुन सुरक्षित अधिवासात सोडले. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nag panchami festival traditional way celebration in sadvli ratnagiri