Nanar bauxite project Ratnagiri latest update
esakal
राजापूर : जनतेला हवे आहे तेच करण्याची आमची आणि सरकारची भूमिका आहे. सरकारमध्ये असलो तरी जनतेशी बांधील आहोत. आम्हीही याच मातीतले आहोत. त्यामुळे कोकणच्या लाल मातीवर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जनतेच्या मागणीप्रमाणे नाणार बॉक्साईट प्रकल्पाची सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट (Nanar bauxite project Uday Samant statement) केले. लोकांना विश्वासात न घेता कोणताही प्रकल्प होणार नसल्याचेही स्पष्ट केले. ‘एकच जिद्द बॉक्साईट रद्द’ या ग्रामस्थांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
Nanar bauxite project Uday Samant statement
esakal