esakal | Kokan - राजापूरातील रिफायनरीला शिवसैनिकांचे वाढते समर्थन
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan - राजापूरातील रिफायनरीला शिवसैनिकांचे वाढते समर्थन

Kokan - राजापूरातील रिफायनरीला शिवसैनिकांचे वाढते समर्थन

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला (refinery project) शिवसेनेचा (shivsena) विरोध असताना बारसू-सोलगाव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. बारसू-सोलगाव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी सेनेचे नाटे विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ३६ जणांच्या प्रकल्प समर्थन समितीमध्ये सेनेच्या चार शाखाप्रमुखांसह तब्बल ५५ जण आता नव्याने सहभागी झाले आहेत. आता स्थानिक पातळीवर शिवसेनेतूनच रिफायनरी प्रकल्प समर्थनासाठी बाह्या सरसावल्या आहेत.

आता सोलगाव-बारसू (solgav-barsu) परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्या ठिकाणी रिफायनरी उभारण्याबाबत सेना नेतृत्वाने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, स्थानिक पातळीवर त्या परिसरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्‍यांनी प्रकल्प समर्थनाचे झेंडे खांद्यावर घेतले. सोलगाव-बारसू परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी त्या परिसरातील गावामधील प्रकल्प समर्थकांनी देवाचेगोठणे-सोलगाव-नाटे दशक्रोशी रिफायनरी प्रकल्प समर्थक समिती गठित केली आहे. ३६ जणांचा समावेश असलेल्या या समितीच्या नेतृत्वाची कमान शिवसेनेचे माजी विभागप्रमुख डॉ. राणे सांभाळत आहे. समिती स्थापनेनंतर सोलगाव-देवाचेगोठणे परिसरातील लोकांचे प्रकल्प समर्थन वाढू लागले आहे. त्यामध्ये शिवसैनिकांसह सेनेच्या शाखाप्रमुखांचा समावेश झाला आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांची गोवावारी थांबणार; NEET परीक्षेसाठी सिंधुदुर्गात केंद्र

चंद्रकांत मिराशी, महेश कोठारकर, अनिल जवरे, नितीन बांदकर या चार शाखाप्रमुखांसह सच्चिदानंद बांदकर, नितीन बांदकर, राजेश चव्हाण, विनायक थळेश्री, हरी साळवी, सतीश साळवी, चंद्रकांत मिराशी, उमेश चव्हाण, महेश कोठारकर, विकास थळेश्री, दिलीप गिरकर, मनाली करंजवकर, वैजयंती लिंगायत, साक्षी पवार, प्रमिला पवार, अस्मिता राणे, सोनू चौधरी, अनिकेत राणे, दिवाकर दळवी, संजय चव्हाण, सचिन थळेश्री, संजय बंदरकर, नितीन घाडी, भागिर्थी चव्हाण, अभिषेक थळेश्री, मोहन रहाटे, सरोज गिरकर, अनघा आडविरकर, सलोनी राणे, डॉ. आश्‍विनी राणे, नंदिनी देवरूखकर, अनिल जवरे, प्रवीण होलम, प्रेमानंद कलव, उत्तम बांदकर, विशाखा मिराशी, यशवंत थळेश्री, दत्ताराम थळेश्री, रोहिदास बांदकर, प्रभाकर बांदकर, पुरूषोत्तम थळेश्री, योगेश मांडवकर, सुनील घाडी, महेश बाणे, मीननाथ बांदकर, सूरज चव्हाण, सचिन कोठारकर, अनंत बांदकर, नीलेश बांदकर, विलास फणसेकर, प्रकाश बांदकर, संदेश घाडी, शिवाजी बांदकर, रूपेश मिराशी व दिवेश मांडवकर आदींचा समावेश आहे.

सेनेतून हकालपट्टी तरीही

नाणार (nanar) परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विरोधामध्ये शिवसेनेने भूमिका घेतली आहे. त्यानंतर, अनेक घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये प्रकल्प समर्थन करणाऱ्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची सेनेतून हकालपट्टीही करण्यात आली; मात्र त्या सैनिकांचे प्रकल्प समर्थन कमी झालेले नाही.

हेही वाचा: कोरोनाविरोधी सेलच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी दिला 'हा' सल्ला

loading image