रिफायनरी समर्थक म्हणतात, आमचे म्हणणे काय आहे ते तरी ऐका..

Nanar Refinery Support Anivansh Mahajan Comment On MP VInayak Raut
Nanar Refinery Support Anivansh Mahajan Comment On MP VInayak Raut

राजापूर ( रत्नागिरी ) - रिफायनरीसंबंधित समर्थनाबाबतचे म्हणणे ऐकून घेण्याची आम्ही अनेकवेळा खासदारांकडे विनंती केली. मात्र रिफायनरी हा विषय संपलेला आहे, मला काहीच ऐकून घ्यायचे नाही, असे सांगत ते आमचे म्हणणे ऐकून घेत नव्हते. मग आम्हाला प्रश्‍न पडला आहे की नक्की कोण आणि कोणाची दलाली करतो, अशा शब्दामध्ये कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. प्रकल्पाचे समर्थन करणारे दलाल असे वक्तव्य करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी समर्थकांचे म्हणणे कधी ऐकून घेतले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार विनायक राऊत यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे दलाल असे वक्तव्य केले होते. त्याचा महाजन यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले. विकासाला चालना देणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आम्ही समर्थन केले. आमची प्रकल्प समर्थनाची बाजू ऐकून घ्यावी अशी अनेकवेळा आम्ही खासदारांकडे मागणी केली होती. मात्र आमच्या मागणीची त्यांनी दखलच घेतली नाही. उलट प्रकल्पाविरोधात लोकांची माथी भडकवणाऱ्या एनजीओ संस्थांचे म्हणणे ऐकून त्यांनी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली. 

प्रकल्पाचे समर्थन करणारे राजा काजवे यांच्या सागवे विभागप्रमुखपदावरून उचलबांगडी केल्याच्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले, प्रकल्पाबाबत फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू तज्ज्ञांकडून समजून घेऊन प्रकल्पाबाबत खासदारांसह शिवसेनेने आपली भूमिका ठरविली असती तर कदाचित आज आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नसती. आम्ही प्रकल्पग्रस्त असून आम्ही प्रकल्प समर्थनाबाबत भूमिका घेणे योग्य आहे. मात्र ज्यांच्या प्रकल्पाशी काहीही संबंध नाही, त्या एनजीओंना या प्रकल्पामध्ये नेमके स्वारस्य का आहे याचा प्रथम शोध घ्यावा, असा टोला खासदार राऊत यांना लगावला आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com