esakal | राजापूरात रिफायनरी समर्थकांचा भाजपात प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena, BJp

राजापूरात रिफायनरी समर्थकांचा भाजपात प्रवेश

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राजापूर : सागवे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर आणि सहकाऱ्‍यांनी शिवसेनेला (shiv sena) ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. त्यांना प्रवेश देणाऱ्या भाजपावर (BJP) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्‍यांकडून टीका होवू लागली आहे. (nanar refinery) हाकलून दिलेल्या मंडळींना पक्षात घेऊन प्रवेशाचे ढोल बडविणे म्हणजे भाजपाचा (BJP) शुद्ध वैचारीक दळभद्रीपणा असल्याची टीका शिवसेनेचे सागवेच्या उपविभाग संपर्कप्रमुख विद्याधर पेडणेकर आणि नाना मसुरकर यांनी केली आहे. कोणी किती वल्गना केल्या तरी, राजापूरचा (rajapur) शिवसेनेचा गड अभेद्यच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद सदस्या शिवलकर आणि माजी विभागप्रमुख राजा काजवे यांना पक्षातून दोन-अडीच वर्षापूर्वी काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा आता शिवसेना संघटनेशी दुरान्वये संबंध नाही. त्यातच, काही सरपंच शिवसेना पक्षाचे नसताना त्यांना शिवसेनेचे दाखवून प्रवेश दिला, असे सांगणे मुर्खपणाचे आहे, असे या दोघानी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये सागवेचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख काजवे, जिल्हा परिषद सदस्य शिवलकर यांच्यासह काही शिवसैनिक, माजी सरपंच यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशावर शिवसेनेचे सागवेच्या उपविभाग संपर्कप्रमुख पेडणेकर आणि मसुरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्‍या पाऊलखुणा! संस्थानच्या सरदारांमध्येच जुंपली लढाई

मुर्खपणाचा बाजार

जिल्हा परिषद सदस्या शिवलकर आणि माजी विभागप्रमुख राजा काजवे यांना पक्षातून दोन-अडीच वर्षापूर्वी काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा आता शिवसेना संघटनेशी दुरान्वये संबंध नाही. त्यातच, काही सरपंच शिवसेना पक्षाचे नसताना त्यांना शिवसेनेचे दाखवून प्रवेश दिला, असे सांगणे मुर्खपणाचा बाजार असल्याची टीका पेडणेकर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पंचायत समिती काबीज करू

खासदार विनायक राऊत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिवसेना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जास्त ताकदीने काबिज करेल, असा दावाही पेडणेकर यांनी केला आहे.

हेही वाचा: कोकणाला 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा; गडनदीला पूर

loading image