esakal | कोकणाला 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा; आंबा घाटात दरड कोसळली; गडनदीला पूर
sakal

बोलून बातमी शोधा

Rain warning with thunderstorms in Next 12 hours in Central Maharashtra

कोकणाला 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा; गडनदीला पूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि संगमेश्‍वरात(Ratnagiri, Rajapur, Dapoli and Sangameshwar) नद्यांना पूर आला आहे. आंबा घाटात (Aamba Ghat)दरड कोसळली असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ratnagiri warning heavy two days landslide amba valley rainfall update akb84

रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडता होता. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. ती दरड काढल्यानंतर चार तासानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. संगमेश्‍वर तालुक्यातील गडनदीला आलेल्या पुरामुळे किनारी भागातील घरांना धोका निर्माण झाला होता. राजापुरात साखर कोंब-भंडारवाडी येथे जमिनीचा भाग खचला असून वाडीतील घरांना धोका निर्माण झाला. पावसामुळे दापोली दाभोळ येतील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. खेड शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून गटारे देखील तुडुंब भरून वाहत आहेत.

हेही वाचा: तारामुंबरी समुद्रकिनारी मच्छिमाराला सापडली देवमाशाची उलटी

अर्जुना, कोदवली नद्यांना पूर, काजळीही दुथडी

अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत पुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे. रायपाटण गांगणवाडी येथून एक वृद्ध अर्जुना नदीतून वाहून गेला आहे. धाऊलवल्ली-आंबेलकरवाडी हा मुख्य रस्ता खचला असून कुवेशी येथे वहाळ फुटून वहाळाचे पाणी घरात घुसले. रत्नागिरी तालुक्यात धामणसे, चाफे येथील भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यामुळे १२ शेतकऱ्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीतील काजळी नदीही दुथडी भरुन वाहत आहे.

(ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतचा पाऊस

* मंडणगड- १४६.६० मिलिमीटर

* दापोली- १८३.२०

* खेड- ११५.९०

* गुहागर- १४४.२०

* चिपळूण- १०४.३०

* संगमेश्वर- ९७.९०

* रत्नागिरी- १२७.४०

* राजापूर- १३६.४०

* लांजा- १२३ मि.मी.

loading image