esakal | पावसाने उडवली दाणादाण ; नॅनो ,दुचाकी गेली वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने उडवली दाणादाण ; नॅनो ,दुचाकी गेली वाहून

पावसाने उडवली दाणादाण ; नॅनो ,दुचाकी गेली वाहून

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : मुसळधार पावसाचा तडाखा रत्नागिरी तालुक्यासह शहराला बसला. काजळी नदीला पूर आला होता. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणा-या पुलावरुन पाणी जात होतं. रात्रीच्या वेळी पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. वेगवान प्रवाहामुळे बाईक आणि नँनो वाहून गेली. सुदैवानं गाडीतील प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आले होते. पावसामुळे रत्नागिरी शहरात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. (nano-car-and-bike-going-way-for-rain-ratnagiri-rain-update-kokan-marathi-news)

रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वेगवान वाऱ्याबरोबर पावसाचा जोरही वाढत गेला. मध्यरात्री पर्यंत पावसाचे तांडव सुरूच होते. यामुळे रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी माती घसरण्याच प्रकार घडले. काजळी नदीने रात्री बारा वाजता धोक्याची पातळी ओलांडली होती. पुलाला पाणी लागले. बाजारात पाणी भरण्याची शक्यता होती. किनाऱ्यावर असलेल्या दुकान चालकांनी वेळीच सर साहित्य सुरक्षित ठिकाणी नेले. ग्रामस्थ पुराच्या भीतीने जागेच होते. काजळीच्या किनाऱ्यावर वसलेल्या अन्य गावातही तीच स्थिती होती. सोमेश्वर मोहल्ल्यात पाणी शिरू लागले होते.

पावसामुळे टेंभ्ये गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणा-या पुलावरुन पाणी जात होतं. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. पोमेंडी येथील (टेंभे पूल) एम.एच.एएफ 4216 ही मोटारसायकल वाहून गेली. एक नँनोही वाहून गेली. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पाण्याचा स्पीड एवढा होता की रस्त्याच्या बाजूचा भाग पुर्णपणे वाहून गेला. पाण्याच्या प्रवाहात नँनो अडकल्यानं ती देखील वाहून गेली. सकाळी देखील एनडीआरएफ च्या टीमने या भागाची पाहणी केली कोणता अनुचित प्रकार घडला नाही. कुणी अडकलं नाही ना याची खात्री केली. सध्या एनडीआरएफचं पथक पुरजन्य भागाची पाहणी करतय. रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट, बाजारपेठ परिसरात पावसाचे पाणी. सकाळी जोर ओसरला आहे.

हेही वाचा- कोल्हापुरात निर्बंध आजिबात शिथिल करणार नाही - अजित पवार

मध्यरात्री 2 वाजेपर्यंत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील काजळी नदीने इशारा पातळीच्या वर वाहण्यास सुरुवात केली होती. मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने नदीचे पाणी स्थिर झाले आणि ते कमी झाले असून बाजारपेठेला कोणताही धोका नाही.स्थानिक रहिवाशी आणि भाजपा पदाधिकारी दादा दळी यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीने धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केली होती. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत कायम राहिल्याने नदीचे पाणी किनारपट्टीवरील गावांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली होती. मात्र रात्री 2 नंतर पावसाचा जोर कमी झाला आणि पाणी स्थिर झाले. त्यानंतर ते कमी झाले. सध्या तरी कोणताही धोका नाही.

जिल्ह्यात 24 तासात सरासरी 98.69 मिमी तर एकूण 888.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 51.00 मिमी , दापोली 99.70 मिमी, खेड 79.80 मिमी, गुहागर 97.90 मिमी, चिपळूण 32.40 मिमी, संगमेश्वर 123.90 मिमी, रत्नागिरी 193.30 मिमी, राजापूर 114.80 मिमी,लांजा 95.40 मिमी.संगमेश्वर तालुक्यात मौजे वायंगणी येथे दरड कोसळली. सदर ठिकाणी सा.बा.विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने रस्ता बंद. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्याने सदर रस्ता बंद होता. सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून झाडे हटविण्याचे काम सुरु. जिवीत हानी नाही. मौजे पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही.

लांजा तालुक्यात मौजे लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद. सदर ठिकाणी सा.बां.विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु. कोणतीही जिवीत हानी नाही.पाऊस सतत पडत असून मोठ्या प्रमाणावर पडत त्यामुळे वरून येणार पाणी गटारे साफ न केल्याने उतारा कडे वळत असून मच्छिमार्केट ,झारणी रोड येथील आजूबाजूला असणाऱ्या घरात हे पाणी शिरलं आहे.त्यामुळे लोक घरातून बाहेर आले आहेत. तर काही लोकांच्या दुकानात पाणी शिरलं आहे. वेळेवर नाले व गटारे साफ नगरपालिका ने केल्यामुळे आज लोकांचे संसार पावसाच्या पाण्याने भिजत आहेत.

loading image