esakal | कोल्हापुरात निर्बंध शिथिल करण्याबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात निर्बंध शिथिल करण्याबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

कोल्हापुरात निर्बंध शिथिल करण्याबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर: कोल्हापूरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यात निर्बंध आजिबात शिथिल केले जाणार नाहीत असंही अजित पवार यांनी सांगितलं.कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार कोल्हापुरात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्याताला कोरोना कमी करण्यासाठी कोल्हापुरकरांनी सहकार्य करावं. संस्थांत्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना अजित पवार यांनी केली.

जिल्ह्यात कोरोना(covid 19) संसर्ग वाढत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे(deputy chief minister ajit pawar and health minister rajesh tope) कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आज (ता. १४) जिल्हा दौऱ्यावर आहेत. महाराणी ताराराणी सभागृहात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.(deputy-chief-minister-ajit-pawar-and-health-minister-rajesh-tope-review-meeting-of-kolhapur-marathi-news)

हेही वाचा- मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात: स्वत: सक्षम व्हा, मराठा समाजाला शाहू महाराजांचे आवाहन

पुढे ते म्हणाले, कोल्हापूरच्या पहिला लाटेत कोल्हापूर जिल्ह्याचे काम उत्तम झाले आहे.तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांसाठी टास्क फोर्स तयार करण्यात येणार असून , गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांना नियमाप्रमाणे बिल भरावे. आरोग्य, वैद्यकीय ,महसूल , ग्राम विकास विभाग यांची एकी असेल तर उत्तम काम होईल.कोरोना पॉझिटिव्ह रेट नुसार कोल्हापुरात कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी कोल्हापूरांनी सहकार्य करावे. कोल्हापुरात मोठ्या संख्येने रुग्ण संख्या असणाऱ्या गावात सर्वांच्या चाचणी करण्याचे आदेश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे.शिवाय लस उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्र वाढविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

म्युकरमायकोसिसची इंजेक्शन देशात तयार होतात. ती केंद्राने ताब्यात घेतली आहे. म्युकरवरील इंजेक्शनसाठी देशात प्रमाणानुसार देण्यात यावीत. त्यासाठी मागणी करण्यात आली आहे. रेमडेसिव्हिरप्रमाणेच या इंजेक्शनचासुद्धा तुटवडा आहे. 15 जूननंतर यात थोडी सुधारणा होईल आणि इंजेक्शन मिळतील अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

loading image
go to top