नारायण राणे यांचे आत्मचरित्र लवकरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

सावंतवाडी - खासदार नारायण राणे हे सध्या आत्मचरित्र लिहीत आहेत. हे आत्मचरित्र त्यांच्याच शब्दात असणार आहे. लवकरच ते वाचकांच्या हाती पडणार आहे, अशी माहिती ट्विटद्वारे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. अब आयेगा मजा...,सबका हिसाब होगा...असेही आमदार राणे यांनी म्हटले केले आहे.

या ट्विंटवर अनेक व्यक्तिंनी प्रतिक्रिया नोंदविल्या असून हे आत्मचरित्र कोकणातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. कोकणचा विकास करणाऱ्यांना हे आत्मचरित्र मार्गदर्शकही ठरणार आहे. तर काहींनी राणेंच्या जीवनावर चित्रपट व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

आता या आत्मचरित्र काय असणार आणि कोणाचा हिशोब मांडला जाणार हे मात्र प्रत्यक्ष आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतरच कळणार आहे. पण याबाबत सर्वानाच उत्सुकता लागून राहीली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane autobiography coming soon