राणेंना कॅबिनेट मंत्रीपद हा कोकणाचा सन्मान; बाळ माने

राणेंना कॅबिनेट मंत्रीपद हा कोकणाचा सन्मान; बाळ माने
Updated on: 

रत्नागिरी : नारायण राणेंसारखा एक हिरा केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये बसला, हा कोकणाचा सन्मान आहे. आता कोकण व महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने राणेसाहेब कोकणाला न्याय देतील, असे प्रतिपादन माजी आमदार बाळ माने यांनी केले. रत्नागिरीत पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

माने म्हणाले की, गेली सात वर्ष मोदी सरकारचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आहे. आगामी काळात कोकणाला आणि महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचे नेतृत्व केंद्र सरकारमध्ये मिळाले पाहिजे, यादृष्टीने जे काही बदल करण्यात आले, त्यामध्ये कोकणाला २ कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो.

गेली २५ वर्षे मी कोकणचे नेते नारायण राणे यांना जवळून ओळखत आहे. कोकणच्या विकासाच्या धडाक्याला खरी सुरुवात राणे यांच्यामुळेच झाली. मधल्या काळात नारायण राणे यांच्या राजकिय प्रवासात चढउतार आले. पण आज ते भाजपचे राज्य सभेचे खासदार आहेत. मध्यंतरी अमितभाई शाह जेव्हा सिंधुदुर्गमध्ये मेडिकल कॉलेजच्या उदघाटनाला आले तेव्हा त्यांनी सांगितलं होते आणि त्या वचनाची पूर्तता राणे यांच्या शपथविधीमुळे झाली. त्यांना जे खातं मिळाले आहे सूक्ष्म आणि  लघु मध्यम उद्योग, हे अतिशय महत्त्वाचे खाते आहे. देशाची जी निर्यात आहे त्यामध्ये या खात्याचा खूप मोठा वाटा असल्याचं माने यावेळी म्हणाले. 

दरडोई उत्पन्नवाढीसाठी उपयोग

कोकणच्या विकासाकरीता राणे यांचे नेहमीच झुकतं माप असते. त्यामुळे त्यांच्यावर ही नवीन महत्त्वाची जबाबदारी आल्यामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद झाला आहे. ते या खात्याचा अल्पावधीतच अभ्यास करून लघु उद्योगांची फळी कोकणामध्ये निर्माण करतील. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल, दरडोई उत्पन्न वाढेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com