तिला दहावित आणायचा होता पहिला नंबर...पण शिक्षकानेच देले विष अन्... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

शिरटी ( ता. शिरोळ) येथील दहावीत शिकणारी सानीका नामदेव माळी हीचा मृत्यू पाण्यातून झालेल्या विषबाधेतून झाला होता. तथापी सानिकाला किटकनाशकची बाटली शाळेतील शिक्षक निलेश बाळू प्रधाने (रा. भैरेवाडी, कुरुंदवाड) यानेच आणून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रधाने याला गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. 

शिरोळ (कोल्हापूर) - शिरटी ( ता. शिरोळ) येथील दहावीत शिकणारी सानीका नामदेव माळी हीचा मृत्यू पाण्यातून झालेल्या विषबाधेतून झाला होता. तथापी सानिकाला किटकनाशकची बाटली शाळेतील शिक्षक निलेश बाळू प्रधाने (रा. भैरेवाडी, कुरुंदवाड) यानेच आणून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रधाने याला गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. 

हे पण वाचा - पलूसमध्ये भरदिवसा  उद्योजकावर गोळीबार 

सानिका माळी ही शिरटी हायस्कूल शिरटी येथे, इयत्ता दहावीत शिकत होती. दहावीची प्रॅक्‍टीकल परीक्षा असताना 20 फेब्रुवारी रोजी पिण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्यानंतर तिला अस्वस्थ वाटून ती बेशुध्द पडली. आई वडिलांनी उपचारासाठी खाजगी रुग्नालयात दाखल केले होते. मंगळवारी पहाटे सानिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सानिकाच्या वडिलांनी शिरोळ पोलिस ठाण्यात फिर्याद देताना, अज्ञाताने तिला गंभीर इजा होण्याच्या हेतूने, तिच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये विष मिसळले असल्याची फिर्याद दिली होती. 

हे पण वाचा - पाण्याच्या नळावरचं भांडण घेऊन गेल तुरुंगात

या पार्श्‍वभूमीवर शिरोळ पोलिसांनी सानिकाच्या वर्गातील पाच मुलींचे जबाब घेतले होते. पोलिसांनी गेली दोन दिवस तपास केल्यानंतर या तपासामध्ये, शाळेतील शिक्षक निलेश बाळू प्रधाने याच्यावरती संशयाची सुई होती. या तपासात निलेश प्रधाने याचा सखोल तपास केला असता त्यानेच किटकनाशकाची बाटली सानिकाला आणून दिली असल्याचे तपासात सांगितले आहे. 

या घटनेची प्राथमिक तपासातील माहिती देताना जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. बी. कुंभार म्हणाले, प्रधाने यांनी दिलेल्या प्राथमिक तपासात असे म्हटले आहे की, सानिका हुशार होती. तीला दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा होता. परंतु, तिला प्रथम क्रमांक मिळण्याची शाश्‍वती नसल्याने, तिला ही परीक्षा टाळण्यासाठी आजारी पडायचे होते. यासाठी किटकनाशक आणून द्यावे असे तिने सांगितले होते. यामुळे 14 फेब्रुवारी रोजी किटकनाशकची बाटली आणून दिली होती. यामुळे प्रधाने याला अटक करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student dies from food poisoning in shirol kolhapur