esakal | 'एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतरही सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यूच आले'
sakal

बोलून बातमी शोधा

'एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतरही सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यूच आले'

'एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतरही सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यूच आले'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचे (covid-19) संकट कमी होत आहे. मात्र असे असूनही काही निवडक जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी झालेला नाही. कोरोनाचा प्रादर्भाव वाढणाऱ्या जिल्ह्यांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे. या प्रदेशात कोरोनाचे रुग्णसंख्येचा आलेख कमी - जास्त होत आहे. यावरून नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीटद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरुन मुख्यमंत्र्यांवर (uddhav thackeray) टीका केली आहे.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग (sindhudurg) आणि रत्नागिरीने (ratnagiri) शिवसेनेला स्थापनेपासून साथ दिली. त्याच्या बदल्यात शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात 901 तर रत्नागिरीमध्ये 1 हजार 561 मृत्यू दिले आहेत, याला संपूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. पुढे ते म्हणाले, दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यूच आले आहेत. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड? असा सावालही त्यांनी केला आहे.

दरम्यान गेले चार दिवस जिल्ह्यातील चाचण्या वाढवण्यात आल्याने कोरोनाची स्थिती समाधानकारक झाली आहे. काल (16) झालेल्या सात हजार चाचण्यात 603 बाधित सापडले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी दर 8.61 टक्के वर आला. 1 जुननंतर प्रथमच १० टक्केपेक्षा दर कमी झाला. काही दिवसांपुर्वी तो 15.7 टक्के होता.

loading image
go to top