शिवसेनेची चार टकली येतात, झेंडा दाखवून पळून जातात : राणे

narayan rane
narayan rane
Updated on: 

कणकवली (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे मला कळत नाही, कुठेतरी चार टकले येतात, झेंडा दाखवतात आणि पळून जातात ही शिवसेनेची अवस्था आहे. एसटी महामंडळातील कामगार पगारासाठी आत्महत्या करत आहेत. ही भयानक अवस्था आहे. या प्रश्नाकडे ठाकरे सरकारचे लक्ष नाही. फक्त नारायण राणे कुठे जातात याकडे लक्ष आहे. असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेत कणकवलीत केला.

पुढे ते म्हणाले की,'आमच्या सभेसाठी प्रचंड मोठा ताफा आहे. सात ते आठ हजार लोक रस्त्यावर आहेत. शिवसेनेच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील ५३ माणसं आहेत. ही शिवसेनेची अवस्था आहे. आमच्या विरोधात काही चालणार नाही, आधी चांगला कारभार चालवा. जन आशीर्वाद यात्रेला आल्यापासून मी पाहतोय किती हार, किती गुच्छ. ते हार आणि गुच्छ माझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत. पैसे सगळेच मिळवतात पण मी हाराची किंमत पैशात करत नाही.'

Summary

आपण नको ते उद्योग सोडून देऊया आणि आपल्या प्रगतीसाठी हवे ते उद्योग करूया.

मला मिळालेल्या या खात्यामुळे मी जनतेला आर्थिक सक्षम करू शकतो. आपण नको ते उद्योग सोडून देऊया आणि आपल्या प्रगतीसाठी हवे ते उद्योग करूया. यासाठी पुण्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर तयार होणार आहे. तेथून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. यापूर्वी कोकणातला बांधव हा मुंबई, पुण्याला नोकरीसाठी जात होता. मात्र आता या ठिकाणी उद्योग निर्माण करून अनेकांना रोजगाराची संधी दिली पाहिजे असे राणे म्हटले.

narayan rane
वैभव नाईक,नितेश राणेंसह भाजप-शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हा दाखल

तसंच देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी प्रयत्न करूया हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. देश महासत्तेच्या दिशेने चालला आहे. आतापर्यंत २६ योजना मोदी सरकारकडून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदींना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना सर्वानी करावी अशी मी आशा करतो असेही राणेंनी यावेळी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com