
कणकवली/नांदगाव : सावडाव धबधबा पावसाळ्यानंतरही सुरू राहावा, यासाठी धरणाचे काम सुरू आहे. हे पूर्ण झाल्यानंतर चार महिने चालणाऱ्या सावडाव धबधबास्थळी बारमाही पर्यटन सुरू होईल, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले. सावडाव धबधबा सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा खासदार राणे, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत झाला.