22 आमदार लपवलेले, यंत्रणेला वासही लागू दिला नव्हता - राणे

आता हिंमत असेल तर शिवसेनेने ते काम करून दाखवावे, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे.
22 आमदार लपवलेले, यंत्रणेला वासही लागू दिला नव्हता - राणे
Summary

आता हिंमत असेल तर शिवसेनेने ते काम करून दाखवावे, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे.

सावंतवाडी : चिपी विमानतळ कायम सुरू राहावे, यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. नजीकच्या मोपा विमातळाचा यावर काहीही परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यासाठी त्या ठिकाणच्या धावपट्टी वाढविणार आहे. दीपक केसरकर यांच्या पालकमंत्रिपदाच्या काळात ही धावपट्टी कमी करण्यात आली होती. आता हिंमत असेल तर शिवसेनेने ते काम करून दाखवावे, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

राज्य सरकार कधी कोसळणार, हे आपण सांगू शकणार नाही; मात्र न सांगता कार्यक्रम आटोपणार असे सांगत यापूर्वी २२ आमदार आपण लपवून ठेवले असता संबंधित यंत्रणेला त्याचा वासही लागू दिला नव्हता, असे राणे म्हणाले. राणे यांनी सावंतवाडी पालिकेला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी संचिता महापात्रा उपस्थित होते.

22 आमदार लपवलेले, यंत्रणेला वासही लागू दिला नव्हता - राणे
कोकणात करेक्ट कार्यक्रम; शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत

राणे म्हणाले, ‘‘मी दोडामार्ग तालुक्यातील आडाळीत एमआयडीसी प्रकल्प आणला; परंतु त्या ठिकाणीही शिवसेना आडवी आली. आज उद्योगमंत्री शिवसेनेचा असतानाही ही एमआयडीसी त्यांना पुर्ण का करता आली नाही? आज याठिकाणी आणि उद्योगमंत्री नाही तर त्यांचे चिरंजीव येऊन बसतात; मात्र माझ्याकडे असलेल्या केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खात्याअंतर्गत येथील तरुण-तरुणींना उद्योग, रोजगार देणे, विकास दर वाढवणे यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ ते म्हणाले, ‘‘कोकण रेल्वे ट्रकच्या बाजूला सिंगापूरी नारळाची झाडे लावणार आहे. आसाममधील बांबूची लागवड जिल्ह्यातील जंगलाच्या बाजूने करून रोजगार निर्मिती करू. माझ्या खात्याअंतर्गत याठिकाणी सुके मासे, कुक्कुटपालन यासारख्या उद्योगांना चालना देण्यात येणार आहे. एखाद्या व्यवसायासाठी बँकेकडून सहकार्य मिळत नसेल तर संबंधितांनी माझ्या कानावर ती गोष्ट घालावी.’’

ते म्हणाले, ‘‘केसरकर यांनी कोकणाला, सिंधुदुर्गाला आणि पर्यायाने सावंतवाडीला आजपर्यंत काय दिले? त्यांची पालिकेवर गेली २३ वर्ष सत्ता असताना त्यांनी नेमका कोणता विकास केला, ते सांगावे. चिपी विमानतळासारख्या प्रकल्पावर मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यासाठी मी तीन हजार चारशे मीटर इतकी धावपट्टीची लांबी ठेवली होती; परंतु पालकमंत्रिपदाच्या काळात केसरकरांनी ती कमी करताना दोन हजार पाचशे मीटर इतकी केली. येणाऱ्या काळात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून त्यासाठी धावपट्टीची लांबी पुन्हा एकदा वाढवणार आहे.’’

22 आमदार लपवलेले, यंत्रणेला वासही लागू दिला नव्हता - राणे
पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ

बांदा-संकेश्वर महामार्गासाठी प्रयत्न

बांदा-संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाण्यासाठी लक्ष घालणार आहे. त्यासाठी सद्यस्थितीत प्रकल्प कुठल्या स्थितीत आहे, याची माहिती घेणार आणि तो शहरात नेता येईल का, यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रकल्पाचा आराखडा पूर्ण झाल्यास ते अशक्य असल्याचेही श्री. राणे यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून अपेक्षा निरर्थक

राज्य सरकार जनतेला अधोगतीकडे नेणारे आहे. या सरकारमधील मंत्र्यांना विकासाचा दृष्टिकोन नाही. एकूणच सरकार हवालदिल झाले असून जनतेने हिताच्या अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल, असे राणे यांनी सांगितले.

22 आमदार लपवलेले, यंत्रणेला वासही लागू दिला नव्हता - राणे
Defamation case: राहुल गांधी राहणार गुजरात कोर्टात हजर; वाचा काय आहे प्रकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com