sudhagad people
sakal
पाली - सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बिबट्याचा थरार आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. शुक्रवारी (ता. 23) संध्याकाळी म्हशी शोधण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा बिबट्याशी आमनासामना झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.