आता ओबीसीचे थेट पंतप्रधानांना साकडे....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

2011च्या राष्ट्रीय जणगणनेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे 2021 च्या जनगणनेत ओबीसी वर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी असा ठराव...

चिपळूण (रत्नागिरी) : 2011च्या राष्ट्रीय जणगणनेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे 2021 च्या जनगणनेत ओबीसी वर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, असा ठराव कामथे खुर्दच्या ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून ग्रामसभेचा ठराव अमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा- गुहागरमधील 199 खातेदारांना यामुळे मिळाला दिलासा...

जातीनिहाय जनगणना न झाल्यास गावात येणार्‍या प्रगणकाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत असा  ठरावदेखील पारित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कामथे खुर्द ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली होती. राष्ट्रीय जनगणना करताना ओबींसीची जातीनिहाय जणगणना करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार ग्रामस्थांच्या मागणीवर ग्रामसभेत चर्चा झाली. त्यानुसार ओबीसी वर्गाची जातीनिहाय जनगणना व्हावी, असा ठराव करण्यात आला.

हेही वाचा- सेना घेणार आता नाणार समर्थकांची दखल.... ?

ओबीसी वर्गाची जातीनिहाय जनगणना करा

त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांना एस. सी, एस.टी विद्यार्थ्यांप्रमाणे शंभर टक्के स्कॉलरशिप मिळावी, ओबीसी शेतकर्‍यांना एस. सी. एस. टी शेतकर्‍यांप्रमाणे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा. सरकारी नोकरीतील ओबीसी, एस. सी. एस. टी. चा बॅकलॉग विशेष अभियान राबवून भरण्यात यावा. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यात यावे, आदी मागण्या ग्रामसभेच्या ठरावात करण्यात आल्या आहेत. 2021 ला केंद्र सरकारची राष्ट्रीय जनगणना होणार आहे. त्यामध्ये ओबीसीची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना होणार नसेल तर गावात येणार्‍या प्रगणकाला गावातील ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत, असाही ठराव मंजूर करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: national census 2011 in indida kokan marathi news