
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धुळीतच
मंडणगड: तालुक्यातील सद्य:स्थितीत कागदावर असणारा राष्ट्रीय महामार्ग अनेक समस्यांनी ग्रासला आहे. साईड पट्टीवर टाकण्यात आलेल्या मातीचा प्रचंड धुरळा झाला असून वाहने गेल्यानंतर धुळीचे लोट उडतात. त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते आहे. या धुरळ्यात दुचाकीस्वारांची तारांबळ उडते आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी आंबडवे-लोणंद या तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्गाची शिरगाव ते आंबडवे या अंतरात जुजुबी दुरुस्ती करण्यात आली होती. या अंतरातील साईडपट्टी नव्याने माती टाकून तयार करण्यात आली. काही प्रमाणात खड्डे मुजविण्यात आले. २२ कि.मी. अंतरातील सर्व गतिरोधक काढण्यात आले.
या संदर्भात माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरही जागोजागीचे गतिरोधक यंत्रणेनेपान २ वरदौऱ्यानंतर पुन्हा होत तसे केलेले नाहीत. मंडणगड शहर, तुळशी, पाले या अंतरातील साईडपट्टी माती टाकून नीट करण्यात आली. यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला व वेळ निभावून नेण्यात आली. मात्र यानंतर या रस्त्याकडे यंत्रणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सध्या तुळशी घाट ते पाले या अंतरातील साईडपट्टी दौऱ्यानंतर पाणी टाकले नसल्याने पूर्णपणे उखडली आहे. या रस्त्यावर तालुक्यातील सर्वाधिक वाहतूक सुरु असते. त्यामुळे या रस्त्यावरून येणारे वाहन व प्रवासी धुळीने भरून जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. याशिवाय गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने गतिरोधकांची आवश्यकता पुन्हा अधोरेखित होवू लागली आहे.
दोन गट तयार करणार
शिबिरात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींमधून पोहता येणारे व पोहता न येणारे असे दोन गट तयार केले जाणार आहेत. या शिबिरात पूर आपत्तीला कसं तोंड द्यावे, त्याची तयारी कशी करावी, स्वत:चा जीव व दुसऱ्याचा जीव कसा वाचवावा, लाईफ सेव्हिंग इक्विपमेंटचा वापर कसा करावा, वित्तहानी कशी टाळावी आदींबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Web Title: National Highways Travel Dusty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..