esakal | उटीतील अपयशावर मात  करत राजापूरच्या काजोलचा सुवर्णपदकाचा चौकार
sakal

बोलून बातमी शोधा

National Powerlifting Competition in Tamil Nadu Selection of Indian team for World Cup kajol gaurav sports news

राजापूरची सुकन्या काजोल गेली सात वर्ष पॉवलिप्टींगध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत पदकांची लयलूट करीत आहे.

उटीतील अपयशावर मात  करत राजापूरच्या काजोलचा सुवर्णपदकाचा चौकार

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर  (रत्नागिरी) : तामिळनाडू येथे पॉवरलिफ्टिंग इंडिया फेडरेशनतर्फे झालेल्या सिनिअर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या कजोल गुरव हिने भारतीय रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व करताना सुवर्णपदक पटकाविले. काजोलने 52 किलो वजनी गटात 427.5 किलो वजन उचलून सुवर्णपदकाला गवसवणी घातली. त्यातच स्कॉट, बेंचप्रेस, डेडलिफ्ट या तीनही प्रकारात सर्वात जास्त वजन उचलून तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या सुवर्णमय कामगिरीमुळे तिची इंडोनेशिया येथे होणार्‍या वर्ल्ड पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.


राजापूरची सुकन्या काजोल गेली सात वर्ष पॉवलिप्टींगध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत पदकांची लयलूट करीत आहे. आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू प्रतिक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बंगलवाडी येथील व्यायमशाळेमध्ये कसून सराव करणार्‍या काजोलने सबज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर राज्य राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य संघातून, तर विद्यापीठ आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाकडून खेळत अनेक पदकांची कमाई केली. त्यानंतर तीने रेल्वे स्पोर्ट कोटा अंतर्गत झालेल्या निवड स्पर्धेत अव्वल कामगिरी करून मुंबई येथे पश्‍चिम रेल्वेमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर गेली चार वर्षे भारतीय रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व करीत राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवित आहे. 

हेही वाचा- फ्लॅशबॅक ; शाहीरतिलक अन्‌ शिवछत्रपतींच्या पराक्रमाची थोरवी! -

जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

राजापूरमध्ये क्रीडाविषयक फारशा सुविधा उपलब्ध नसतानाही मेहनत आणि जिद्दीने काजोलने पॉवलिफ्टींगमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले आहे. तिच्या यशामध्ये वडील अशोक गुरव आणि अस्मिता गुरव यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. 

उटीतील अपयशावर मात

जानेवारी महिन्यामध्ये उटी येथे झालेल्या इंटररेल्वे पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पश्‍चिम रेल्वे संघाकडून खेळताना कजोलचे 10 किलो वजनाच्या फरकाने सुवर्णपदक हुकले होते. त्यावेळी तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र अपयशाने खचून न जाता तामिळनाडू येथील स्पर्धेमध्ये तीने सुवर्णमय कामगिरी केली. 

संपादन - अर्चना बनगे

loading image