Raigad News : रायगडमध्ये सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा एल्गार: प्रलंबित मागण्यांसाठी १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप

Nationwide Workers Strike India : देशातील ५ कोटी कामगारांच्या मागण्यांसाठी १२ तारखेला देशव्यापी संप पुकारला आहे. रायगडमध्ये जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर धरणे होणार आहेत. आठवा वेतन आयोग, सुधारित पेन्शन, रिक्त पदे भरणे व कंत्राटीकरण बंद करण्याच्या प्रमुख मागण्या आहेत.
Nationwide Workers Strike India

Nationwide Workers Strike India

sakal

Updated on

पाली : देशातील ५ कोटी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. 12) देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक, संघटित व असंघटित कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व तालुका तहसीलदार कार्यालयांसमोर भव्य धरणे निदर्शने करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com