esakal | मनाप्रमाणे काम करू देत नसल्याने NCP च्या शहराध्यक्षांचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

Satisha Chikane

मनाप्रमाणे काम करू देत नसल्याने NCP च्या शहराध्यक्षांचा राजीनामा

sakal_logo
By
सिध्देश परशेट्टे

खेड (रत्नागिरी) : वरिष्ठ नेते पक्ष वाढवण्यासाठी मनाप्रमाणे काम करू देत नसल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे (Satish Chikane) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. आगामी काळात कोणत्या पक्ष्यातून काम करणार हे मात्र चिकणे यांनी लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगितले. खेड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी चिकणे यांच्या सोबत शहर सचिव तुषार सापटे उपस्थित होते.

यावेळी चिकणे म्हणाले, मी राष्ट्रवादी पक्षाचे काम पक्ष स्थापनेपासून करत होतो. गेल्या चार वर्षांपासून माझ्याकडे पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. परंतु गेल्या पालिका निवडणुकीत पक्षाचे चिन्ह बाजूला ठेऊन आघाडी झाली आणि तेव्हा पासून मला शहराध्यक्ष म्हणून शहरात पक्ष वाढवण्यासाठी वरीष्ठ पदाधिकारी व नेते काम करू देत नाहीत.

गेल्या दीड वर्षापासून पक्षात शहरातील राजकारणात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत मला सहभागी करून घेतले जात नसून अक्षरशः गळचेपी सुरू आहे. त्यामुळे हे शहराध्यक्ष पदाचे शोभेचे मुकुट मला आता नको असे मी पक्ष श्रेष्ठीना सांगून देखील त्यांनी कोणतेच लक्ष दिले नाही. त्यामुळे मी पक्षातील माझ्या सहकाऱ्यासोबत चर्चा करून पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

शहरात राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते वाढवत आहेत असा समज पसरवला जात आहे. आगामी पालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्य व जिल्हा पातळीवरील राजकीय समिकरणांचा विचार न करता कोणतीच पावले खेड शहरात  राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांकडून उचलली जात नसल्याची खंत चिकणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षातुन आगामी कालावधीत काम करणार हे आपले राजकिय मित्र व कुटुंबियांसोबत आजच चर्चा करून जाहीर करणार असल्याचे चिकणे यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top