रत्नागिरीत राष्ट्रवादीला मोठा धक्का

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

रत्नागिरी - आमदार उदय सामंत यांनी ऐन विधानसभा आणि पालिका नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक नेते यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

त्यामुळे आगामी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीतील शहर विकास आघाडीची राजकीय गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुक्‍यात आता कुठे उभारी घेण्याचा प्रयत्न करीत होता. व्यक्ती केंद्रित राजकार करून उदय सामंत तालुक्‍यातील 90 टक्के राष्ट्रवादी आपल्याबरोबर शिवसेनेत आणली. एकेकाळचा तालुक्‍यातील दोन नंबरचा राष्ट्रवादी पक्ष तालुक्‍यात नावाला उरली. 

उदय सामंत यांच्या प्रभावी कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या संपर्कात होते. आज त्याला मुहूर्त स्वरुप आले. राष्ट्रवादीचे केतन शेट्ये, वक्रतुंड ऊर्फ मुन्नू शेट्ये, अल्पसंख्याक नेते यासिनमामू कोतवडेकर, शाहजन पटेल, नगरसेवक मुसा काझी, नगरसेवक सोहेल साखरकर यांनी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेत प्रवेश करण्याची त्यांनी चुणूक दिली. आगामी काळात रत्नागिरीत हा प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. 

आमदार उदय सामंत यांच्या पुढाकारातून ही भेट झाली. या वेळी खासदार अनिल देसाई, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, पाणी सभापती सोहेल मुकादम, अल्पसंख्याक विधानसभा संघटक जमुरात अल्जी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leaders in Ratnagiri enters in Shivsena