
रत्नागिरी - मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, न मिळाल्याने मला धक्का बसला आहे. माझ्याबाबतची कटुता अजून संपलेली नाही, या शंकेला वाव राहतो. त्यातून माझ्या विश्वासाला तडा गेला आहे, अशी प्रतिक्रिया गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याचे शल्य त्यांच्या मनात असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले होते. शिवसेनेकडून गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना विजयश्री खेचुन आणली. गुहागरमध्ये त्यांनी शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करताना त्यांना आश्वासने दिली गेल्याची चर्चा होती. सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात ते प्रबळ दावेदार म्हणूनच ओळखले जात होते. मंत्रीपद न मिळाल्याने राज्यातील नाराज आमदार पुढे येत आहेत. राज्यातील ठाकरे सरकारचा काल (ता. 30) मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी अनेकांना डावलण्यात आले. त्यामुळे काही नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही नाराज नसल्याचे जरी सांगितले तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
याबाबत आमदार जाधव म्हणाले, मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले होते. काही गोष्टी आश्वासित केल्या होत्या, त्या सर्वांसमोर बोलायच्या नसतात. मी त्यांची वेळ मागितलेली आहे. ते ज्या दिवशी वेळ देतील त्यावेळी मी त्यांच्याशी बोलणार आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेत सर्वात जास्त निवडून आलेला आमदार आहे, प्रशासनाचा मला दीर्घकाळ अनुभव आहे, उत्कृष्ट संसदपटू म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे, सातत्याने निवडून येत आहे, संसदीय कार्यप्रणाली मला माहीत आहे. आदित्य ठाकरे यांना या अनुभवाचा फायदा देण्याचा प्रयत्न केला असता, मी निश्चिंत होतो की मंत्रिमंडळमध्ये असेन, यासर्वांना एकाएकी तडा गेला आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - चिपळूण शिवसेना मरगळ कधी झटकणार
मला लाल दिव्याच्या गाडीचा मोह नाही, मला सत्तेचा मोह नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी आश्वासित केल्या होत्या, त्या सर्वांसमोर बोलायच्या नसतात. मेरिटवर, गुणवत्ता याच्या जोरावर माझा विचार होऊ शकला नाही, योग्यतेमध्ये मी कुठे कमी पडलो, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.