esakal | खासदार सुनील तटकरेंवरील हक्कभंग प्रस्तावाचा मंडणगडात राष्ट्रवादीकडून निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

NCP protests against MP Sunil Tatkares infringement proposal in Mandangad

घटक पक्षांवर विकासाच्या श्रेयवादातून सुरु असलेल्या कुरघोडीबद्दल कार्यकर्त्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

खासदार सुनील तटकरेंवरील हक्कभंग प्रस्तावाचा मंडणगडात राष्ट्रवादीकडून निषेध

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड - खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाचा मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेवतीने आज मंडणगड येथे पत्रकार परिषदेत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे राज्यात महाविकासआघाडी असताना दापोली मतदार संघात बिघाडीचे चित्र निर्माण झाले आहे.

घटक पक्षांवर विकासाच्या श्रेयवादातून सुरु असलेल्या कुरघोडीबद्दल कार्यकर्त्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादम म्हणाले, खासदार सुनील तटकरे हे महाविकासआघाडीत सर्वसमावेश नेतृत्व असून मतदार संघातील विकासाच्या प्रश्नावर ते केंद्र व राज्यशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या प्रयत्नाने अनेक विकासकामे मार्गी लागली असून विरोधकांचे अस्तित्वही ते कायम जपत असतात. त्यांच्या पाठ पुराव्यामुळेच आंबेत पुल व जेटीस निधी प्राप्त झाल्याने म्हाप्रळ येथे पक्षाचेवतीने औपचारीक कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम प्रशासकीय नव्हता असे असताना स्थानीक कार्यकत्यांनी दिलेल्या चुकीच्या माहीतीच्या आधारे विद्यमान आमदार आपल्या भूमिका ठरवणार असतील तर त्यांमुळे महाआघाडीत समन्वय राहणार नाही. विकासकामाचा प्रोटोकॉल सांभाळण्याची अपेक्षा विद्यमान आमदार करीत असतील तर 2014- 19 या कालावधीत मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार कार्यरत असताना सत्तेचे कोणतेही संविधानीक पद नसतानाही पर्यावरण मंत्र्यांसोबत विकास कामांचे शेकडो नारळ फोडताना उपस्थित राहणाऱ्या आमदार योगेश कदम यांनी किती प्रोटोकॉल पाळले असा प्रश्नही उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश कार्यकारिणी सचिव प्रकाश शिगवण, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष फैरोज उकये, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, राकेश साळुंखे यांनी विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या कृतीवर परखड मत व्यक्त करताना विकासाच्या मुद्यावर सहकारी पक्षांशी राजकारण करु नये. जे राजकारणात पेरले आहे तेच उगवणार असा टोला देताना मंडणगड तालुका विकास ही आपली जबाबदारी असल्याने कदम याांनी जबाबदारी पुढे येऊन काम करावे असा सल्ला दिला. महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विद्यमान आमदारांनी समन्वयाची भूमिका न घेतल्यास आगामी काळात राजकीय संघर्षाची भूमिका कायम राहणार असल्याचे संकेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले.

हे पण वाचामाझ्यावर जी कारवाई करायची असेल ती करावी ; खासदार सुनिल तटकरे

पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश कार्यकारिणी सचिव प्रकाश शिगवण, तालुका अध्यक्ष मुझ्झफऱ मुकादम, जिल्हा उपाध्यक्ष फौरोज उकये, जि.प. सदस्य. प्रमोद जाधव, पं.स. सदस्य नितीन म्हामुणकर, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, हरेश मर्चंडे, राकेश साळुंखे, हसरत खोपटकर, नगरसेवक अँड. सचिन बेर्डे, सुभाष सापटे, दिनेश लेंढे, नगरसेविका नेत्रा शेरे, मोबीन परकार, सर्फराज चिपोलकर, सतिष दिवेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image