सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 12 जणांना कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

जिल्ह्यात आज 12 नवीन कोरोना रुग्ण मिळाले आहेत. 30 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. सध्या सक्रिय रुग्ण 216 राहिले आहेत. 

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात आज 12 नवीन कोरोना रुग्ण मिळाले आहेत. 30 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. सध्या सक्रिय रुग्ण 216 राहिले आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित 6 हजार 31 मिळाले आहेत. यातील 5 हजार 645 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 164 रुग्ण मृत झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 216 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत आहेत. उर्वरित 210 रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी दिली. 

216 रूग्ण सक्रिय असून त्यापैकी एक रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. हा रुग्ण ऑक्‍सीजनवर उपचार घेत आहे. जिल्ह्याबाहेर जावून सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आर. टी. पी. सी. आर टेस्टमध्ये 29 हजार 589 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 220 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 65 नमूने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 22 हजार 422 नमुने तपासले. पैकी 1 हजार 937 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 69 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 52 हजार 11 नमूने तपासण्यात आले. 

तालुकानिहाय पॉझिटीव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेल्यांची संख्या ः

देवगड 428 (9), दोडामार्ग 352 (4), कणकवली 1822 (41), कुडाळ 1355 (32), मालवण 523 (17), सावंतवाडी 818 (43), वैभववाडी 181 (7), वेंगुर्ला 532, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 20 (1). तालुकानिहाय सक्रीय रुग्ण ः देवगड - 28, दोडामार्ग - 30, कणकवली - 34, कुडाळ - 46, मालवण - 20, सावंतवाडी - 17, वैभववाडी - 10, वेंगुर्ले - 25 व जिल्ह्याबाहेरील 6. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New 12 Corona Patient Found In Sindhudurg District

टॉपिकस