ब्रेकिंग - रत्नागिरीत कोरोना सहाशे पार ; आणखी 15 जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 15 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्याता कोरोना रूग्णांच्या संखेत दिवसें-दिवस वाढ होतच आहे. नुकत्याचा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्याता आणखी १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या १५ जणांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता सहाशे पार झाली आहे. 

काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 15 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 614 झाला आहे. नवीन 15 अहवालांमध्ये कापसाळ (ता. चिपळूण) 03, गोवळकोट (ता. चिपळूण) 03, घरडा (ता. खेड) 06, लोटे (ता. खेड) 02 तर घरडा कॉलनीतील एका रुग्णाचा समावेश आहे. 

आज जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 01 रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 08 रुग्ण असे एकूण 09 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 448 झाली आहे. तर एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 140+1 आहे. एकूण मृत्यूंची संख्या 26 इतकी आहे. 

 

हे पण वाचा -  रत्नागिरीत एक जुलैपासून हे राहणार सुरु, हे राहणार बंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 16 corona case in ratnagiri