रत्नागिरीत आज 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह

राजेश शेळके
Friday, 23 October 2020

जिल्ह्यात दिवसभरात 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 7 हजार 678 झाली आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून दिवसभरात नव्याने 32 कोरोना बाधित सापडले आहेत. 248 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात चिपळूण येथील एका तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यूदर 3.72 टक्क्यावर स्थिर आहे. 

जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे. या मोहिमेमुळे वाढणार्‍या संसर्गाला चांगलाच अंकुश बसला आहे.

जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 8 हजार 321 झाली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 15 तर अ‍ॅन्टिजेन चाचणीत 17 जण पॉझिटिव्ह मिळाले. सर्वांत जास्त 7 रुग्ण राजापूर तालुक्यात मिळाले आहेत. दापोली- 1, खेड- 4, गुहागर- 4, चिपळूण- 6, रत्नागिरी- 5, लांजा तालुक्यात 5 रुग्ण सापडले आहेत. मंडणगड, संगमेश्‍वर या तालुक्यात एकही बाधित सापडलेला नाही. 

जिल्ह्यात दिवसभरात 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 7 हजार 678 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 92.28 टक्के झाले आहे. कोरोनामुळे चिपळूण येथील 38 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 310 झाली असून मृत्यूदर 3.72 वर स्थिर आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांपैकी 249 जणं विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हे पण वाचामी लाईट बिल भरणार नाही; तुम्हीपण भरू नका  

 एकूण बाधित         8,321
* एकूण निगेटिव्ह      46,865
* एकूण बरे झालेले     7,678
* मृत पावलेले           310
* उपचाराखालील       249

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 32 corona positive case in ratnagiri