esakal | ब्रेकिंग - रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातून कोरोना रूग्ण पळाला ; नव्या ३७ रूग्णांची भर 
sakal

बोलून बातमी शोधा

new 34 corona positive case in ratnagiri

 परजिल्ह्यातून आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये पुढे येत आहेत. त्यामुळे दर दिवशी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.

ब्रेकिंग - रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातून कोरोना रूग्ण पळाला ; नव्या ३७ रूग्णांची भर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - रविवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,557 झाली आहे. आज दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 52 वर पोचली आहे.


 परजिल्ह्यातून आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये पुढे येत आहेत. त्यामुळे दर दिवशी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. रविवारीही नवीन रुग्णांच्या संख्येत भर पडलेली आहे. त्यामध्ये रत्नागिरी 4, दापोली 11, कामथे 20, गुहागर मधील दो रुग्णांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसात मृतांची नोंद झालेली नव्हती; मात्र रविवारी रत्नागिरीतील दोन आणि राजापूरमधील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे झालेल्या रुग्णांचा आकडाही समाधानकारक आहे. रविवारी 34 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 987 झाली आहे. आज सोडण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय 8, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर 7,  कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 11, खेड येथील 8 रुग्णांचा समावेश आहे.


रत्नागिरी तालुक्यात शनिवारी पूर्णगड येथे कोरोनाचे सहा रुग्ण हे आढळले. काही दिवसांपूर्वी झालेल्या लग्न समारंभातून कोरोनाचा फैलाव झाल्याचे कारण पुढे येत आहे. त्या लग्न समारंभात कोविड रुग्णालयातील एक नर्स सहभागी झाली होती. कोविड टेस्टिंग लॅबमध्ये त्या नर्सची ड्युटी होती. समारंभ आटपून आल्यानंतर त्या नर्सला ताप आला. तिची कोविड टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या नर्सच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. 


अन् कोरोना रूग्ण पळाला 

जिल्हा कोव्हीड रुग्णालयात उपचार घेणारा कोरोना बाधित रुग्ण पळून गेल्याचा प्रकार पुढे आले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तो रुग्ण गुहागर तालुक्यातील पडवे गावचा असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी कोव्हीड रुग्णालयात त्या रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेत दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृती सुधारत होती, म्हणून शनिवारी अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले. मध्यरात्री त्या रुग्णाने रुग्णालयातून गायब झाला.

हे पण वाचा चिपळूणात कॅनोन शोरूमध्ये चोरी ; शटर उघडून चोरट्यांनी  मारला डल्ला 

रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचा शोध सुरु झाला. पोलिसांकडे आलेल्या माहितीनुसार तो रुग्ण पडवे येथील आहे. त्या रुग्णाची पत्नी त्याच्या देखरेखीसाठी रुग्णालयात होती; मात्र वॉर्डमधून तो कधी पळून गेला, हे समजलेच नाही. त्याची पत्नी त्याचा शोध घेत फिरत होती. कोव्हीड रुग्णांवर लक्ष ठेवण्यासठी बंदोबस्त असतानाही कोरोना बाधित रुग्ण पळून कसा जातो हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकूण पॉझिटिव्ह         1557


बरे झालेले                 987
मृत्यू                         52

अ‍ॅक्टीव्ह                 518

अ‍ॅक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन  148

संस्थात्मक विलगीकरण    100
होम क्वॉरंटाईन            20,428

प्रयोगशाळेत प्रलंबित         524

 संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image