रत्नागिरीत कोरोनाचा कहरच : आणखी ४० जणांना कोरोनाची बाधा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त अहवालामध्ये कोरोनाचे 40 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी : रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त अहवालामध्ये कोरोनाचे 40 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 1250  इतकी झाली आहे. त्यात रत्नागिरी तालुक्यातील  पाच रुग्णाचा समावेश आहे. रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार घरडा  10,  रत्नागिरी 5, कामथे 14, लांजा 6 आणि दापोली 5 रुग्ण आहेत.

रत्नागिरी तालुक्यात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. या पाच रुग्णांमध्ये दोन राजीवडा येथील रुग्ण आहेत. एक गुडेवठार तर एक गावडेआंबेरे येथील रुग्ण आहे. कोतवडे येथे एक रुग्ण सापडला असून हा रुग्ण रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होता. कोव्हिड रुग्णालयात स्वॅब घेतल्यानंतर या नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

दरम्यान राजीवडा येथील एका कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी गेले असता या कर्मचाऱ्यांसोबत येथील नागरिकांनी हुज्जत घातली. रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यावरून रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला पाचारण केले. नागरिकांची समजूत काढून संबंधीत रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 40 coronaviras casein ratnagiri total corona patient number is 1250