ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी ५० जणांना कोरोनाची बाधा....

राजेश शेळके
Monday, 3 August 2020

 शहरात कोरोनाचा फैलाव होत आहे.  दररोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत.

रत्नागिरी :  शहरात कोरोनाचा फैलाव होत आहे.  दररोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. काल रात्री प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी शहरात 50 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1931 झाली आहे.यातील तब्बल सहा रुग्ण हे थिबापॅलेस परिसरातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील सहा रुग्ण हे थिबापॅलेस परीसरातील आहेत. तर रत्नागिरी -11, कामथे - 22, कळबणी - 13, लांजा - 1, ॲन्टीजने टेस्ट - 3 रुग्णांचा समावेश आहे.     

 

दरम्यान ,जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाबाधित एकाचा मृत्यू झाला असून, ४७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील मृतांचा आकडा ६१ वर पोचला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित ॲक्‍टिव्ह रुग्णांची संख्या ५२२ इतकी आहे. काल (ता. १) रात्री सापडलेल्यांमध्ये रत्नागिरी शहर आणि परिसरातील रुग्णांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा- अतिक्रमणाबाबत प्रशासनाला इशारा, जाणून घ्या नेमके प्रकरण! -

कोरोना तपासणी प्रयोगशाळेतून काल दिवसभरात अहवाल प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा एक हजार ८८१ वरच थांबला आहे. काल रात्री ५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. त्यात रत्नागिरी तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. तालुक्‍यात २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 

हेही वाचा- कुटुंब नियोजनात यंदा `हा` जिल्हा मागे -

काल रत्नागिरी तालुक्‍यातील कापडगाव येथील ७८ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६१ वर पोचली असून, रत्नागिरी तालुक्‍यातील संख्या वाढली आहे.

दृष्टिक्षेपात
 एकूण पॉझिटिव्ह    १९३१
 बरे झालेले    १२९९
 मृत्यू    ६१
 ॲक्‍टिव्ह रुग्ण    ५२२
 संस्थात्मक विलगीकरण    १२१
 होम क्वॉरंटाईन    २२ हजार ७१६
 प्रलंबित अहवाल    ४८६

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 50 corona patients found in ratnagiri district total count in 1931