रत्नागिरीत दिवसभरात 77 नवीन रुग्ण तर 109 जणांची कोरोनावर मात 

राजेश शेळके 
Wednesday, 30 September 2020

आज 77 नवीन बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 7 हजार 408  झाली.

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या चोविस तासात 77 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 7 हजार 408 झाली. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील रुग्ण सर्वाधिक आहे. एका दिवसामध्ये जिल्ह्यात 109 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 263 झाली आहे. सर्वाधिक मृत रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

आज 77 नवीन बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 7 हजार 408  झाली. यात रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात दोघांचा कोरांनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरीतील 80 वर्षाच्या पुरुषाचा मंगळवारी (ता. 29), तर चिपळूण येथील 78 वर्षीय महिलेचा 26 सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 263 झाली आहे. मृत्यूदर काल पेक्षा एका पॉइंटने खाली घसरून तो 3.55 टक्के झाला आहे. 
जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात आला असला तरी तो वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत तपासणीत त्याचा चांगला फायदा होत आहे. रुग्ण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्क सक्तीचे केले आहेत. आज सापडलेल्या एकूण 77 रुग्णांमध्ये आरटीपीसीआरमधील 38 अहवाल, तर अ‍ॅन्टीजेनमध्ये 39 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंडणगड, दापोली, लांजा या 3 तालुक्यात एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. उर्वरित खेड- 7, गुहागर- 12, चिपळूण- 21, संगमेश्‍वर- 1, रत्नागिरी- 33, राजापूर- 3 येथे नव्याने रुग्ण सापडले आहेत. 

हे पण वाचा -  सर्पदंश झाल्यापासून महिलेवर तब्बल तेरा तासानंतर उपचार

 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.38 टक्के

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. 109 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकुण 6 हजार 325 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.38 टक्के झाले आहे.
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  -- 7,408
* बरे झालेले रुग्ण - 6,325
* एकूण निगेटिव्ह - 36,552
* एकूण मृत्यू - 263
* उपचाराखालील रुग्ण - 703

 संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 77 corona patients in ratnagiri