बाराखडीचे उच्चार संगीतमय करून इंटरॅक्‍टीव्ह चौदाखडीची निर्मिती ; कोकणातील अनोखा उपक्रम, राज्यातील विद्यार्थ्यांनाही लाभ

new activity in konkan Creating an interactive quartet with musical accents and its useful also maharashtra students
new activity in konkan Creating an interactive quartet with musical accents and its useful also maharashtra students

रत्नागिरी : अध्ययन व अध्यापन प्रक्रिया कृतीयुक्त, सुलभ, मनोरंजक आणि आनंददायी करण्यासाठी बाराखडीचे उच्चार संगीतमय करून इंटरॅक्‍टीव्ह चौदाखडी निर्मितीचा प्रयोग संगमेश्‍वर तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नारायण शिंदे यांनी यशस्वी केला. एखादी आकडेमोड किंवा विषय विद्यार्थ्यांना समजावून देणे यामुळे सोपे झाले आहे. रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. तरीही काही शिक्षक त्या भागातही नेटाने काम करत आहेत.

अनेकजण मुलांना शिक्षण देण्यासाठी नवनवीन उपाय करत आहेत. संगमेश्‍वर तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा वाडावेसराड येथील तंत्रस्नेही शिक्षक नारायण शिंदे यांनीही असाच वेगळा प्रयोग शाळेत राबवला आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नकोत, म्हणून तंत्रज्ञानाचा वापर ते करत आहेत. कृतीयुक्त शिक्षणातून मुलांना आनंददायी बनवण्यावर त्यांचा आतापर्यंत भर आहे. नेट सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावी, अशी वाचनगती वाढवणारी संगीतमय उच्चारासह इंटरॅक्‍टिव्ह चौदाखडी शिंदे यांनी बनवली आहे.

या चौदाखडीचे एकूण सात संच आहेत. ते सर्व एकत्र मिळावेत, म्हणून त्याची पीडीएफ फाईल तयार केली आहे. याचा वापर फक्त त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात व राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. संगीतमय उच्चार हे त्याचे वेगळेपण आहे. या चौदाखडीचा वापर अंगणवाडीतील विद्यार्थीही करत आहेत.

त्यामुळे वाचन करणे सोपे जात असून प्रत्येक गोष्टीचे आकलन विद्यार्थ्यांना होत आहे. याची तयार केलेली पीपीटी नाशिक, यवतमाळ, औरंगाबाद, लातूर यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयुक्‍त ठरत आहे. या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, गटशिक्षणाधिकारी त्रिभुवणे यांच्यासह विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनीही कौतुक केले.

"कृतीमधून विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे जाते, यासाठी संगीतमय चौदाखडी पीपीटीच्या माध्यमातून बनवली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहता येतोच शिवाय कृतीही करता येते. याचा लाभ राज्यभरातील मुले घेत आहेत."

- नारायण शिंदे, तंत्रस्नेही शिक्षक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com