रत्नागिरी तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवी बोट ; घुसखोरी, तस्करी रोखणार

New boat in Ratnagiri Coast Guard fleet
New boat in Ratnagiri Coast Guard fleet
Updated on

रत्नागिरी - भारतीय जलक्षेत्रामध्ये घुसखोरी, तस्करी आणि अवैधरीत्या बेकायदेशीर कामांना रोख लावण्यासाठी तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये आयसीजीएस सी-452 ही बोट सामिल झाली आहे. तटरक्षक कमांडर (समुद्री पश्‍चिम क्षेत्र) अवर महानिर्देशक राजन बड़गोत्रा, पीटीएम, टीएम यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बोटीचे आज तटरक्षक दलाच्या पश्‍चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक ए. पी. बडोला यांच्या उपस्थितीत जयगड (रत्नागिरी) येथे अनावरण करण्यात आले.

ही बोट जयगड येथे तैनात राहणार आहे.
 भारतीय तटरक्षक अवस्थान सी-452 ही 54 इंटरसेप्टर बोटींच्या मालिकेतील 52वी बोट आहे. अत्याधुनिक नेव्हीगेशन आणि संदेश सेंसर्स प्रणालीने युक्त ही बोट उष्णकटिबंधीय वातावरणात कार्यरत राहण्याची क्षमता असणारी आहे. ताशी 45 नाविक मेल या वेगाने समुद्रात संचार करू शकते. ही एक संपूर्णत: भारतीय बनावटीची बोट आहे. हिची निर्मिती एल अ‍ॅन्ड टी शिपयार्ड मर्यादित या कंपनीद्वारे सूरत येथे करण्यात आलेली आहे. बोट 27 मीटर लांब असून इंधन क्षमता ताशी 25 समुद्र मैल या किफायती वेगाने सुमारे 500 समुद्र मैल असेल. या जहाजाची प्राथमिक भूमिका तस्करी प्रतिबंध, सागरी गस्त, शोध आणि बचाव यासारखी विविध कामे पार पाडणे ही आहेत. या जहाजासाठी एक अधिकारी आणि 14 नाविकांची तुकडी तैनात असेल. या जहाजात आयबीएस, ईसीडीआयएस आणि जीएमडीएसएस ही अत्याधुनिक उपकरणे आहेत. 12.7 एमएम हेवी मशीनगन हे या जहाजाचे मुख्य शस्त्र आहे.

या बनावटीचे हे तिसरे जहाज

तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामील झाल्यानंतर आयसीजीएस सी-452 ही बोट जयगड (रत्नागिरी) येथे तैनात राहील. या बोटीच्या कमान अधिकारी पदाची जबाबदारी सहाय्यक कमांडंट अमोघ शुक्ला यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. आयसीजीएस सी-452 हे भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या अधीन पाचवे जहाज आहे. या बनावटीचे हे तिसरे जहाज आहे. हे जहाज भारतीय तटरक्षक रत्नागिरीची विविध कार्ये पार पाडण्याची क्षमता वाढवेल.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com