
एका बोटीची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे. रत्नागिरीतील भाट्ये खाडीत त्याचे गुरुवारी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
रत्नागिरी : अतिवृष्टीत चिपळूण, खेड, राजापूरसह रत्नागिरीत ठिकठिकाणी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो. घरेच्या घरे पाण्याखाली जातात. नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा बोटींची आवश्यकता भासते. ती कमी आता भरून निघाली असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाच आधुनिक बनावटीच्या बोटी प्राप्त झाल्या आहेत. एका बोटीची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे. रत्नागिरीतील भाट्ये खाडीत त्याचे गुरुवारी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. त्याला सामोरे जाताना जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडते. दोन वर्षांपूर्वी तिवरे धरण दुर्घटनेप्रसंगी व्हाईट आर्मीची मदत घ्यावी लागली होती. पुरामध्ये मदत करण्यासाठी काही वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने रबरच्या तीन बोटी घेतल्या होत्या. त्या खेड, चिपळूण पालिकेकडे सुपुर्द केल्या. पुराच्यावेळी मदतयंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवीन पाच बोटींचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली असून नवीन बोटी रत्नागिरीत दाखल झाल्या.
हेही वाचा - कोकण : सावर्डेत निकमांविरोधात सेनेचा कस
पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत रत्नागिरीतील भाट्ये खाडीत डेमो घेतला. या बोटी एचडीपी (high density polyethylene) बनावटीच्या आहेत. फायबरमधीलच हा एक प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रात्यक्षिकावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह सुनील कीर, पोलिस निरीक्षक केळकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दळवी, डगळे, कोळंबेकर, तलाठी झिटे, सरफरे, अग्निशमन विभागचे अधिकारी उपस्थित होते.
अशा वेळी भासते बोटींची गरज...
सरत्या पावसाळी हंगामात यंदा अतिवृष्टी झाली होती. चांदेराई, हरचिरी, पोमेंडी, सोमेश्वर या परिसरात काजळी नदीचे पाणी भरले होते. या पुराचे पाणी सोमेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येते. अशा वेळी बोटींची गरज भासते. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
हेही वाचा - आपल्याच नंदेकडून दागिने घेतले ते परत दिलेच नाहीत
बोटींची वैशिष्ट्ये व विभागणी अशी...
संपादन - स्नेहल कदम