

Police Issue Warning Over WhatsApp Scam Messages
Sakal
पाली : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वचजण एकमेकांना व्हॉट्सअप व समाज माध्यमांवर शुभेच्छा देतात. मात्र बुधवारी (ता. 31) मध्यरात्री पासून ते १ जानेवारी २०२६ या काळात सायबर गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाखाली सायबर फसवणूकीची शक्यता असल्याने नागरिकांना पोलीस प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.