esakal | आधी कुठे उभे राहणार हे ठरवा; निलेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचा पलटवार :Nilesh Rane
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर पत्रकार परिषद

राणेंनी भविष्यात केवळ निवडून येण्याची स्वप्नेच बघावीत. मतदार संघातील शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत.

आधी कुठे उभे राहणार हे ठरवा; राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचा पलटवार

sakal_logo
By
- प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) : माजी खासदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) निवडणुकीत कुठे उभे राहायचे ते ठरवावे. कुडाळ-मालवण मतदार संघातील शिवसैनिक खासदार विनायक राऊत, (Vinayak Raut)आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या विजयाची हॅट्रीक करतीलच तर तुमच्या पराभवाची हॅट्रीक केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर (Hari Khobrekar) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

माजी खासदार राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार नाईक यांचे डिपॉझिट येत्या निवडणुकीत जप्त करणार असल्याचे आव्हान दिले होते. या पार्श्‍वभूमीवर खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेत राणे यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाळू नाटेकर, श्याम झाड यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: राजीनामा द्या, मगच बोला; भाजपच्या 3 सदस्यांना शिवसेनेचे आव्हान

खोबरेकर म्हणाले, आमदार नाईक यांचे येत्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त करण्याच्या भाषा करणार्‍या नीलेश राणेंनी कुठून उभे राहणार ते प्रथम ठरवावे. कारण येत्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची हॅट्रीक करण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. कुडाळमधील काही जणांचा भाजपमध्ये राणेंनी प्रवेश घेतला; मात्र त्यांनी उष्ट्या पत्रावळी जवळ घेऊन शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. कारण मतदार संघातील शिवसेनेचे कार्यकर्ते नीलेश राणेंच्या पराभवाची हॅट्रीक केल्याशिवाय गप्प बसणार नाही.

राणेंनी भविष्यात केवळ निवडून येण्याची स्वप्नेच बघावीत. मतदार संघातील शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला हरविण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहील.माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, बबन शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यात शिवसेना संघटना बळकट करण्याबरोबरच ती वाढविण्याचे, पुढे नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राणेंनी स्वप्ने बघत राहावीत असा टोलाही खोबरेकर यांनी यावेळी लगावला.

loading image
go to top