esakal | राजीनामा द्या, मगच बोला; भाजपच्या 3 सदस्यांना शिवसेनेचे आव्हान:Rajan Naik
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक

राजीनामा द्या, मगच बोला; भाजपच्या 3 सदस्यांना शिवसेनेचे आव्हान

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेल्या माजी सभापती राजन जाधव, डॉ. सुबोध माधव व सौ. प्राजक्ता प्रभू या कुडाळ पंचायत समितीच्या तीन सदस्यांनी शिवसेना सोडून केवळ स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना विश्वासाने निवडून दिलेल्या मतदारांचा त्यांनी अपमान केला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या या तिनही सदस्यांमध्ये थोडीतरी नैतिकता बाकी असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि मगच टिका करावी, असे खुले आव्हान शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक यांनी दिले.

या तीन सदस्यांनी नुकताच भाजपात प्रवेश करीत शिवसेनेवर आरोप केले होते. त्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख नाईक यांनी शिवसेना शाखेत पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, नेरूर सरपंच तथा विभागप्रमुख शेखर गावडे, पाट उपविभाग प्रमुख महेश वेळकर, शाखाप्रमुख सुनील हळदणकर, बाळा मांजरेकर व पावशी शाखाप्रमुख बंड्या खोत आदी उपस्थित होते.

हेही वाचा: निमंत्रण आले तरच दसऱ्या मेळाव्याला जाईन; अनंत गीते

नाईक म्हणाले, `पंचायत समिती सदस्य जाधव, डॉ. माधव व सौ. प्रभू हे पंचायत समितीचे सदस्य शिवसेनेमुळेच निवडून आले होते. त्यांची ओळखही शिवसेनेमुळेच झाली. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक आणि जनतेने जीवाचे रान केले; मात्र त्यांनी भाजपात प्रवेश करीत ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांचा तसेच शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी राजीनामा देऊन प्रवेश देणे गरजेचे होते. तो न देता पंचायत समितीच्या निवडणुकीला केवळ चार महिने शिल्लक असताना स्वार्थाने प्रवेश केला आहे. या तीनही सदस्यांच्या पावशी, पाट व वालावल या मतदारसंघात शिवसेना खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत आणि यापुढेही होणार आहेत.

शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे या मतदारसंघातील जनता जानते; मात्र हे सदस्य जर कोणतीही विकासकामे झाली नाहीत, अशी ओरड मारत असतील तर त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात जाऊन शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे पाहावीत. राजन जाधव यांच्या घराशेजारी तर आमदार नाईक यांच्या फंटातून पिण्याच्या पाण्याची विहिर बांधण्यात आली आहे. हे सदस्य पक्ष सोडून गेले म्हणून त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही. 2012 मध्ये असाच एक जिल्हा परिषद सदस्य शिवसेना सोडून गेला होता; मात्र नंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सहा सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे हे तीन सदस्य गेले तरी येत्या पंचायत समितीच्या निवडणुकीत अठराही सदस्य आमचे महाविकास आघाडीचेच असतील. कोण पक्ष सोडून गेला म्हणून शिवसेना संपणार नाही. या तीन सदस्यांमुळे शिवसेनेला अथवा आमदार नाईक यांना कोणताही फरक पडत नाही. तालुक्यात शिवसेनेची संघटना मजबूत असून स्थानिक खासदार राऊत, आमदार नाईक व पालकमंत्री सामंत यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होत आहे असेही नाईक म्हणाले.

loading image
go to top