esakal | मातोश्रीवर अडचणी आल्याने सामंतांचा पत्रकार परिषदेत खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

'मातोश्रीवर अडचणी आल्याने सामंतांचा पत्रकार परिषदेत खुलासा'

'मातोश्रीवर अडचणी आल्याने सामंतांचा पत्रकार परिषदेत खुलासा'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) आणि शिवसैनिकांसमोर सामंत कसे ढोंग करतात तो खरा चेहरा आज फाडला. दोन तासातच शिवसेनेचे आमदार उदय (uday samant) सामंतांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. सामंत कसली संस्कृतीची वार्ता करताय? अख्ख्या रत्नागिरीला (ratnagiri district) माहिती आहे. २०१९ च्या निवडणूकीत तुमची सगळी संस्कृती काढली होती. सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये. अनेक माजी मुख्यमंत्री रत्नागिरीत येतात त्यावेळी सामंत भेटायला जात नाहीत. म्हणून ही राजकीय संस्कृती सामंतांच्या तोंडातून शोभत नाही. असा जोरदार प्रहार भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी सामंतावर केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी एकदिवस घेतलेल्या भेटीमुळे मंत्री उदय सामंत अडचणीत आले आहेत. याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर उदय सामंत यांना खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली. ही पत्रकार परिषद म्हणजे मातोश्रीवर अडचणीत आल्याने, निव्वळ सारवासारव असल्याचे निलेश राणे यांनी म्हंटले आहे. खरे तर सामंत बंधूंचा ढोंगीपणाचा खरा चेहरा जनतेसमोर उघडकीस आणला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना त्या भेटायचे नव्हतेच, पण सामंत बंधू वशील्याने गर्दीतून वाट काढत फडणवीस यांच्यासमोर उभे राहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटावं लागलं, असेही निलेश राणे यांनी सांगितले. मातोश्रीवर या सगळ्या गोष्टी चालत नाही हे सामंतांना महिती आहे, त्यामुळे आहे ते मंत्रिपद वाचवण्यासाठी उदय सामंताना हा खुलासा करावा लागला, असे निलेश राणे यांनी सांगितले.

हेही वाचा: रिफायनरी प्रकल्पाने विकासाला चालना : नाना पटोले

ते पुढे म्हणाले की, मी केलेले आरोप हे सामंत यांचा खरा चेहरा दाखवण्यासाठी केले होते. शिवसैनिकांसमोर आणि उद्धव ठाकरेंसमोर सामंत जे ढोंग करतात, तो खरा चेहरा उघडकीस आणला. या सामंतांनी कधीच दखल घेण्यासारखे काम केले नाही, त्यामुळे ते दखल घेण्यासारखेही नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. सामंतांनी जनसेवा करावी, कामे करावीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, वादळ होऊन गेल आहे. फक्त आपला व्यवसाय टिकवण्यासाठी आणि भविष्यात भाजप येणार हे नक्की असल्यामुळे पुढची पेरणी करायची म्हणजे उद्या अडचणीचं वाटलं तर उडी मारायला बरी, हे सामंतांचे जुने धंदे असल्याचे सांगत निलेश राणे यांनी उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चिरफाड केली.