शिवसेनेच्या नाराजीने ओबामांची झोप उडाली ; नीलेश राणेंची बोचरी टीका 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे

रत्नागिरी - शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांना झोप लागत नसेल, असा टोला नीलेश राणे यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून शिवसेनेला लगावला आहे. यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा जुंपणार आहे. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. परदेशातील राजकीय नेते भारतातील राजकीय नेत्यांबाबात अशा पद्धतीचं मत जाहीर करू शकत नाहीत, असं संजय राऊत यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे? अशी विचारणाही संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून भाजपा नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी टोला लगावला आहे. 

हे पण वाचा मग काय सगळीकडे अंधारच अंधार: नितेश राणेंची आदित्य ठाकरे यांच्यावर कडक शब्दात टिका

शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांना झोप लागत नसेल, असा टोला नीलेश राणे यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून लगावला. शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल. आता ओबामांचं कसं होणार? या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामांचं आता काही खरं नाही, असं उपहासात्मक ट्‌विट नीलेश राणे यांनी केलं आहे. 

https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/state-transport-minister-anil-parab-visit-ambabai-temple-kolhapur?amp>

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane criticism on shiv sena