esakal | निकृष्ट पोषण आहारात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हात : निलेश राणे यांचा आरोप 
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh rane criticism on shivsena leader

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट पोषण आहार पुरवठादारांकडून दिला जात असल्याचा तक्रारी येत आहेत.

निकृष्ट पोषण आहारात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हात : निलेश राणे यांचा आरोप 

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदमातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा होत होते. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात असून लवकरच नावासकट हे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट पोषण आहार पुरवठादारांकडून दिला जात असल्याचा तक्रारी येत आहेत. निकृष्ट, सडलेला, आरोग्यास हानिकारक असून स्थानिक पातळीवरून होत असलेल्या तक्रारींकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचेच दिसत आहे. या प्रकाराबाबत भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून खळबळजनक आरोप केला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात शालेय पोषण आहार निकृष्ठ तसेच धान्य गोदममधून बुरशीयुक्त असताना देखील पुरवठादार निकृष्ट धान्य पुरवठा करत होता. यात काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हाथ आहे, असा आरोप करत ते ही काही दिवसात नावासह बाहेर काढणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा - मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी हा तर भाजपचा अपशकुन

या विषयात पण तक्रार करून अजून कोणालाही अटक झाली नाही, असा आरोप राणे यांनी केला आहे. या प्रकरणात तक्रार होऊन देखील कोणला अटक झालेली नाही. असा आरोप राणे यांनी केला आहे. 

<

>

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image