ठाकरे सरकारचे मंत्री इतके घाबरट आहेत का?

ठाकरे सरकारचे मंत्री इतके घाबरट आहेत का?

मालवण (सिंधुदुर्ग) :मालवणात एका ग्रामस्थाने वादळानंतर पाणी नाही म्हणून रस्त्यावरती रिकामी घागरी ठेवली होती. त्या व्यक्तीची एवढीच इच्छा होती की मंत्री वडेट्टीवार(Minister Vijay Vadeddiwar)यांनी उतरून त्याची विचारपूस करावी पण ठाकरे सरकारचे मंत्री इतके घाबरट आहेत की पोलिसांना पाठवून त्या व्यक्तीचं न ऐकताच मंत्री निघून गेले. भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंनी (Nilesh Rane)महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

nilesh-rane-criticism-vijay-wadettiwar-tauktae-cyclone-visit-malvan-kokan

तौक्ती चक्रीवादळामुळे तालुक्यातील देवबाग गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे देवबागच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेड्डीवार यांच्या ताफ्या समोर एका ग्रामस्थाने पाण्याच्या रिकामी घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवल्याची घटना आज घडली. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी गाडीतून उतरून रस्ता मोकळा केला.

तौक्ते चक्रीवादळानंतर तालुक्यातील देवबागमध्ये आठवड्या पासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी खारे बनले असूनही येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. याठिकाणी मंत्री आणि पुढारी येतात, पण ग्रामस्थांच्या व्यथा वेदना समजून घेत नसल्याने येथील रुक्मांगत मुणगेकर या ग्रामस्थाने आज सकाळी देवबागच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेड्डीवार यांच्या ताफ्या समोर पाण्याच्या रिकामी घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवला.

रस्ता रोखल्याने मंत्री गाडीतून उतरून आपला प्रश्न जाणून घेतील, अशी अपेक्षा मुणगेकर यांना होती. मात्र अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे पोलिस प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. यामुळे स्वतः पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी स्वतः गाडीतून उतरून मुणगेकर यांना बाजूला करत रस्ता मोकळा केला. यानंतर मुणगेकर यांचे म्हणणे ऐकून न घेता वडेड्डीवार येथून मार्गस्थ झाले. गावात आठ दिवस पाणी नाही, त्यामुळे मंत्र्यांनी निदान आमचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया मुणगेकर यांनी यानंतर व्यक्त केली. गावात आठ दिवस पाणी नाही,मग आम्ही करायचं काय ? असा सवाल यावेळी सौ. मुणगेकर यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com