ब्रेकिंग: कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार

ब्रेकिंग: कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार
Updated on: 

कोल्हापूर:कोल्हापूर (Kolhapur Lockdown)मध्ये सुरू असणारे कडक लॉकडाऊन रविवारी (ता.23) रात्री 12 पासून शिथिल होणार. सोमवार (ता.24) पासून राज्य शासनाच्या नियम (State Government Rules)आणि पूर्वीच्या अटीनुसार लॉकडाऊन सुरू राहिल.असे संकेत मिळाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कडक लाॅकडाऊन ची अंमलबजावणी झाली. रस्त्याला रस्त्यावर फिरत होते त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला.दरम्यान हे लाॅकडाऊन वाढणार अशी अनेकांची शंका होती. मात्र रविवारी रात्रीपासून लाॅकडाऊन शिथिल करून सोमवारपासून राज्य शासनाच्या नियमानुसार व्यवहार सुरू राहतील असे संकेत मिळाले आहेत. कडक लाॅकडाऊन हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. तरीही हा कडक लाॅकडाऊन सर्वानी पाळला. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन एक हजार ते दीड हजार पर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यू दरही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लॉकडाउन करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही, अशी भूमिका सर्वच आमदारांनी घेतली . त्यानंतर शनिवारी रात्री पासून खडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मात्र सोमवारपासून राज्य शासनाच्या नियम आणि पूर्वीच्या अटीनुसार लॉकडाऊन सुरू राहिल.असे संकेत मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com