
मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाषण केले. त्यांनी भाषणात विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
सिंधुदुर्ग : मागील तीन दिवसापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाषण केले. त्यांनी भाषणात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये शेतकरी आंदोलन, कोरोना काळात वाटप करण्यात आलेलं धान्य, महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्न, सावरकर यांच्याबाबतचा भारतरत्नचा मुद्दा, हिंदुत्त्वाचा मुद्दा, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा मुद्दा या विषयांवर त्यांनी भाष्य केले. मात्र भाषणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
दरम्यान भाजपाचे निलेश राणे यांनीही ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भाषण केले आहे. यांना मु़द्द्याला धरुन बोलता येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावे लागले की राज्याच्या जनतेला अशा व्यक्तीला सहन करावे लागत आहे. अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा - खेडच्या पोलिस निरीक्षक पत्की यांची बदली ; विधान परिषदेत गृहमंत्र्यांची घोषणा
यावेळी आणखी एका मु्द्द्यावरुन निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भारतीय जवानांचा अपमान केला आहे. 'चीनसमोर पळ काढला' असं वादग्रस्त विधान केले आहे. जवानांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. ताबडतोब त्यांनी जवानांची माफी मागावी.
काय म्हणाले मुख्यमंत्री
'बाबरी मशीद प्रकरणानंतर पळ काढणाऱ्यांनी शिवसेनेला हिणवू नये, आमचं हिंदुत्व केवळ शेंडी अन् जानव्याचे नाही,' असे आक्रमक उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला विधानसभेत लक्ष्य केले. सरकारवर जरुर टीका करा पण, महाराष्ट्राची बदनामी करु नका. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या आरोपांची व टीकेची खिल्ली उडवली.