esakal | 'मुख्यमंत्री कोरोना जाऊ देणार नाहीत; फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्री यांना घरीच बसायला आवडतं'
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh rane criticized on CM uddhav thackeray on conference question related corona in sindhudurg

मात्र या कॉन्फरन्समध्ये त्यांनी नागरिकांना विचारलेल्या एका प्रश्नांमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.   

'मुख्यमंत्री कोरोना जाऊ देणार नाहीत; फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्री यांना घरीच बसायला आवडतं'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध घातले आहेत. तसंच ठिकठिकाणी नाकेबंदी आणि वाहनांची तपासणी करुन राज्यात किंवा संबंधित भागात प्रवेश दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्स द्वारे जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र या कॉन्फरन्समध्ये त्यांनी नागरिकांना विचारलेल्या एका प्रश्नांमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.   

तुम्हाला लॉकडाउन हवे आहे का ? या मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर आता निलेश राणे यांनी टीका केली आहे. निलेश राणे यांनी म्हटलं की, जगामध्ये असा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत हा माणूस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि हा माणूस कोरोना जाऊ देणार नाही.

हेही वाचा - फक्त 56 आमदार आहेत ते... निलेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचले -

देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. त्यावरूनही निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्यांना घरीच बसायला आवडतं.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

राज्यात कोरोना पुन्हा वाढतोय. पुन्हा लाट आली की नाही हे पुढच्या एक दोन आठवड्यात समजेल. पण तोपर्यंत काही निर्बंध घालणे गरजेचं आहे. राज्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर काही दिवस बंदी असेल. तसंच 'मी जबाबदार' ही नवी मोहीम सुरु झाली असून मास्क घालणं, हात धुणे आणि सोशल डिस्ट्न्सिंग पाळणं या ती गोष्टी कराच. लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. 

संपादन - स्नेहल कदम