'मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या हट्टापायी आरे कारशेडची जागा बदलली'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

राज्य सरकारने मेट्रो कारशेडबद्दल घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे.

रत्नागिरी : आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट आहे, असे ट्वीट करत भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे. आरेतील मेट्रो कारशेडच्या वादावर रविवारी पडदा पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग होणार असल्याची घोषणा केली.

 

राज्य सरकारने मेट्रो कारशेडबद्दल घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी मेट्रो कारशेडच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य नसल्याचे स्पष्ट करत आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेशही मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. 

हेही वाचा -  अवैध धंद्यामुळे सुसंस्कृत सिंधुदुर्गचा आत्मा दूषित 

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर निलेश राणे यांनी ट्विट करत निर्णयावरून ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. "आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट." करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील किंवा मिळतील की नाही माहीत नाही, कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार. आधीचे पैसे गेलेत, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane criticized on CM uddhav thackeray on the topic of are car shed on his twitter account in ratnagiri