
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या २ हजार ८२१ मतांनी झालेला पराभव हा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बेंडल यांना मतं मिळवून देण्यासाठी चांगली मेहनत घेतली, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.