esakal | निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळा पुन्हा उभा राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळा पुन्हा उभा राहणार

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळा पुन्हा उभा राहणार

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णै : निसर्ग चक्रीवादळामध्ये ज्या ज्या जि. प. शाळांचे नुकसान झाले आहे त्या शाळा उभारण्यासाठी आपण मनरेगामधून फंड उभा करू शकतो. त्यासाठी तेथील ग्रामपंचायतींकडून तसे प्रस्ताव येणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले. हर्णै येथील विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

गुहागर गटामधून निवडून आलो असल्यामुळे मला मच्छीमारांच्या समस्या काय असतात याची जाणीव आहे. माझे वडील आणि आमदार भास्कर जाधव हे 2014 मध्ये तत्कालीन कामगार मंत्री झाले होते. त्यावेळी त्यांना फक्त 46 दिवसच काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी कोकणातल्या मच्छीमारांचा विचार करून माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर मच्छीमार समाजासाठी एका बोर्डाची स्थापना केलेली आहे.

हेही वाचा: भाजपा आमदारावर गुन्हा दाखल; बंदी आदेशाचे केले उल्लघंन

मासेमारीला जाऊन आल्यानंतर मासळी नाहीच मिळाली तर आपलं कुटुंब चालवण्यासाठी या मच्छीमारांना पगाररूपी काही प्रमाणात पैसे मिळण्याची कायद्यामध्ये तरतूद मंत्री भास्कर जाधव यांनी करून ठेवली आहे. तसेच ऑगस्टमध्ये आता लवकरच मासेमारी चालू होत आहे, त्या धर्तीवर या मच्छीमारांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस तरी प्राधान्याने दिला पाहिजे हे आमचे पुढचं नियोजन आहे. जि. प. च्या ज्या-ज्या शाळांच निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, त्या शाळा उभ्या करण्यासाठी मनरेगामधून निधी उभा करू तसे त्या-त्या शाळांच्या ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव लवकरात लवकर मिळाले तर हा कार्यक्रम लवकरात लवकर राबवता येईल असे आश्वसन विक्रांत जाधव यांनी दिले. याप्रसंगी हर्णै बाजारपेठेतील मच्छीमार्केट, धाकटी गोडीबाव येथील राजवाडी अंगणवाडी, जि. प. उर्दू शाळेची इमारतीचे व हर्णै गोळे हायस्कूलमध्ये हर्णै ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

loading image