esakal | भाजपा आमदारावर गुन्हा दाखल; बंदी आदेशाचे केले उल्लंघन
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपा आमदारावर गुन्हा दाखल; बंदी आदेशाचे केले उल्लंघन

भाजपा आमदारावर गुन्हा दाखल; बंदी आदेशाचे केले उल्लंघन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

विटा : जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर ( दोघे पडळकरवाडी, ता. आटपाडी ), सरपंच सज्जन बाबर ( बाणूरगड, ता. खानापूर ) व निलेश नेताजी बाबर ( खंबाळे भा., ता. खानापूर ) यांच्यावर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नायब तहसीलदार चेतन रमेश कोनकर ( तहसील कार्यालय, विटा ) यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली.

हेही वाचा: 'राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे'

पोलिसांनी सांगितले, की १९ जुलै सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या सुमारास बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळी पर्यटन विकास अंतर्गत बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा परिसर विकास व पर्यटन पायाभूत विकासकामाचा प्रारंभाचा कार्यक्रम अंदाजे दीडशे ते एकशे सत्तर लोकांच्या उपस्थितीत करून जिल्हाधिकारी सांगली यांच्या बंदी आदेशाचे उल्लघंन केल्याने वरील चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

loading image