esakal | प्रशासनाने लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा : निलेश राणे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाने लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा : निलेश राणे

प्रशासनाने लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा : निलेश राणे

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : जिल्ह्यात ऑक्सीजनचा साठा अत्यल्प आहे. अनेक लोकांनी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने काही केलेले नाही. जिल्ह्यातील आमदार-खासदारांसह मंत्र्यांकडून कोणाचीही अपेक्षा नाही. ते सगळे बोगस आहेत. पण प्रशासनाने तरी लोकांचे जीव वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटद्वारे केले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनच दुर्लक्ष करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड सेंटर बंद होते. मात्र राणे यांनी तात्काळ लक्ष घालून कोविड सेंटर चालू केले. ऑक्सिजन, बेड यांची कमतरता आहे. रुग्णांचे हाल होत असतानाही शिवसेनेचे आमदार, खासदार बेफिकिर आहेत. म्हणून प्रशासनाने यात लक्ष घालून सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत.

सध्या कोरोना महामारीत शिवसेनेचे आमदार, खासदार हरवले आहेत. आमदार खासदारांकडून अपेक्षा संपल्या आहेत. आशा वेळी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे. कोरोना होईल म्हणून ते मतदारसंघात फिरकताना दिसत नाहीत. एवढंच नव्हे तर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? हाच मोठा प्रश्न जनतेला पडत आहे. कोरोना रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा द्यावी, त्यांचे हाल होता कामा नये, म्हणून प्रशासनाने तरी लोकांचा जीव वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा.